नवी दिल्ली :वायू प्रदूषण आणि वाढत्या तापमानामुळे झोप मोड होण्याची शक्यता आहे. मात्र वायू प्रदूषण, वाढत्या तापमानाबरोबर कार्बन डाय ऑक्साईडची उच्च पातळीचा आपल्या झोपेवर विपरित परिणाम होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. स्लीप हेल्थ या जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. बेडरूममधील पर्यावरणीय बाबींचा या संशोधनात आढावा घेण्यात आला आहे.
बेडरूममध्ये वायू प्रदूषणाची उच्च पातळी :या संशोधनासाठी संशोधकांनी 62 नागरिकांवर संशोधन केले. यात या संशोधकांनी दोन आठवडे अॅक्टिव्हिटी मॉनिटर्स आणि स्लीप लॉगच्या सहाय्याने मागोवा घेतला. बेडरूममध्ये वायू प्रदूषणाची उच्च पातळी, कार्बन डायऑक्साइड, आवाज आणि तापमान जास्त असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या संशोधनातील निष्कर्ष उच्च गुणवत्तेच्या झोपेसाठी बेडरूमच्या वातावरणाचे महत्त्व अधोरेखित करत असल्याचे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील संशोधक मॅथियास बासनर यांनी स्पष्ट केले.
रात्रीची झोप घेणे झाले कठीण :काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच नागरिक झोपेच्या वेळेसोबत स्पर्धा करतात. वाढत्या शहरीकरणामुळे आणि हवामानातील झटपट बदलामुळे रात्रीची झोप घेणे कठीण झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अपुरी झोप, अपुरी कार्यक्षमता जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. त्यामुळे नागरिकांना हृदयविकार, मधुमेह, नैराश्य आणि स्मृतिभ्रंश यासह जुनाट आजारांचा धोका असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
आवाजामुळे झोपेत घट :युनिव्हर्सिटी ऑफ लुईसविले आणि यूएसमधील संशोधकांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ग्रीन हार्ट प्रोजेक्टमधील सहभागींची नियुक्ती केली. त्यांनी लुईव्हिलच्या रहिवाशांच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी 8 हजार झाडे लावण्याचे परिणाम तपासले. मापन केलेल्या प्रत्येक पर्यावरणीय चलांसाठी, संशोधकांनी एक्सपोजर दरम्यान झोपेच्या कार्यक्षमतेची तुलना 20 टक्के पातळी विरुद्ध सर्वात कमी 20 टक्के पातळीशी केल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांना उच्च आवाजामुळे झोपेच्या कार्यक्षमतेत 4.7 टक्के घट झाल्याचे आढळून आले. उच्च कार्बन डायऑक्साइड 4 टक्के घट, उच्च तापमान 3.4 टक्के घट आणि उच्च पीएम 2.5 ते 3.2 टक्के घट आढळल्याचा या संशोधकांनी दावा केला आहे. झोपेच्या व्हेरिएबल्स, सापेक्ष आर्द्रता आणि बॅरोमेट्रिक प्रेशर झोपेच्या कार्यक्षमतेशी कोणताही महत्त्वपूर्ण संबंध नसल्याचे दिसून आले.
हेही वाचा - Exercise Improves Brain Health : व्यायामामुळे सुधारते मेंदूचे आरोग्य, रासायनिक सिग्नल करतात 'असे' कार्य