ऑटिझम ग्रस्तांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने विशेष हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे. या टोल-फ्री हेल्पलाइन नंबरमुळे पीडितेचे कुटुंब या आजाराशी संबंधित माहिती आणि मदत घेऊ शकते. या हेल्पलाइनची सुविधा 24 तास उपलब्ध असेल.
ऑटिझम ग्रस्त मुलांच्या कुटूंबासाठी ही चांगली माहिती असून, कारण आता ऑटिझमची लक्षणे समजून घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी मुलांच्या पालकांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची टोल-फ्री हेल्पलाइन सेवा क्रमांकावर संपर्क करावा. 1800-11-7776 या हेल्पलाइन नंबर 24 तास कधीही कॉल करता येईल. याचबरोबर,1800-599-0019 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर मानसिक आरोग्य पुनर्वसनासंबंधित विषयांवर समुपदेशन केले जाते.
मध्य प्रदेशचे सामाजिक न्याय आणि कल्याण मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी दिव्यांगजनांना त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सरकारद्वारा संचालित टोल फ्री हेल्पलाइन नंबरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच समस्या निवरणासाठी इतर टोल फ्री क्रमांकाचा लाभ घेण्याचेही आवाहन केले आहे.
ही असू शकतात ऑटिझम आजाराची लक्षणे
सामाजिक न्याय व अपंग कल्याण विभागाचे प्रधान सचिव प्रतीक हाजेला म्हणाले की, "ऑटिझम हा एक मानसिक आजार असून, तो एक ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये दिसून येतो. हा आजार झालेली मुले वरकरणी चांगली वाटतात. मात्र, स्वत:मध्येच गुंग असतात. जर मुल व्यवस्थित बोलू शकत नाही, तसेच उत्तर देण्यास असमर्थता, नवीन लोकांना भेटायला घाबरणे, डोळ्यांशी बोलण्यास असमर्थता होणे, ही लक्षण त्यांच्यात आढळून येतात. याचबरोबर तो मुलगा खूप अस्वस्थ होतो, तसेच त्याचा विकास धीम्या गतीने होतो. त्याला दररोज एकसारखाच खेळ खेळण्यास आवडतो. वरील लक्षणे आढळून आल्यास, मग त्याला ऑटिझम झाला आहे, असे समजावे. अशा परिस्थितीत एम्स, दिल्ली या देशातील उत्कृष्ट आरोग्य संस्थांच्या मदतवाहिनीशी संपर्क साधा.
याचप्रमाणे पीडब्ल्यूडी, विशेष शिक्षण, व्यावसायिक थेरपी, व्यावसायिक समुपदेशन, स्पीच थेरपी आणि बौद्धिक पीडब्ल्यूडीजची फिजिओथेरपी, राष्ट्रीय बौद्धिक अपंगत्व सशक्तीकरण या संस्थेच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकाशीही संपर्क साधू शकता. 1800-572-6422 या टोल फ्री क्रमांकावर मानसिक आरोग्याशी संबंधित माहितीसाठी संपर्क साधू शकता. शुक्रवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 या वेळेत संपर्क साधावा.