नवी दिल्ली : आपण जे अन्न खातो, त्यावरुन आपले शरीर आपल्याला प्रतिसाद देत असते. आहारावरुनच आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे पौष्टिक आणि संतुलित आहारामुळे आपल्याला निरोगी शरीर, मधुमेह, कर्करोग, जळजळ आणि हृदयविकारासारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. त्यासह आपले वजन नियंत्रित करण्यासही त्याचा उपयोग होत असल्याचा दावा संशोधक अजहर अली सईद यांनी केला आहे.
इंद्रधनुष्य आहाराची संकल्पना :आपण घेत असलेल्या आहारात विविध वैशिष्टपूर्ण आहाराचा समावेश असायला हवा, असे संशोधक अजहर अली सईद यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी इंद्रधनुष्य आहाराची संकल्पना मांडली आहे. आहार घेताना तुम्ही मनोरंजक आणि आरोग्यदायी संकल्पनांचा वापर करून तुमचे अन्न चवदार आणि पौष्टिक दोन्ही बनवू शकता असे अजहर अली सईद यांनी या संकल्पनेतून स्पष्ट केले आहे. इंद्रधनुष्य आहार घेणे हा चांगले खाण्याचा एक नवीन मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फळे आणि भाज्या हे निरोगी आहाराचा एक भाग आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए (बीटा कॅरोटीन), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि इतर अनेक फायदेशीर पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. उच्च पाण्याचे प्रमाण असलेली फळे आणि भाज्या देखील हायड्रेशनचा उत्तम स्रोत असू शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.