हैदराबाद : हिवाळ्यात आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांच्याशी लढण्यासाठी निसर्गाने आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या दिल्या आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मिळते. पालक, चवळी, शेपू, मेथी अशा अनेक भाज्यांमध्ये (Add green vegetables in your diet) जीवनसत्त्वे आढळतात. तसेच डॉक्टरदेखील आपल्याला हिरव्या पालेभाज्या (Benefits of green vegetables) खाण्याचा सल्ला देतात.
1. शेपू (Shepu/Dill) :गॅसेस, लहान मुलांची पोटदुखी, जंत, कृमी मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीसाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. ही भाजी आवर्जून खायला हवी. अनेकदा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळीत पोट दुखणे, रक्तस्राव अनियमित असणे असे काही त्रास होऊ लागतात. हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शेपूच्या भाजीचा आहारात समावेश करायला हवा.
2. अंबाडी (Roselle) :अंबाडी भाजी खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. चवीला आंबट लागणाऱ्या या भाजीत व्हिटॅमिन ए आणि खनिज पदार्थ भरपूर असतात. तसेच यामुळे वजन आटोक्यात राहते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते, केसांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारशक्ती वाढून सतत सर्दी, खोकला होणे कमी होते.