नवी दिल्ली:आरोग्य तज्ञांनी सोमवारी सांगितले की, मागील दोन वर्षात कोरोना महामारीच्या काळात (Eye care during the Corona epidemic)10 पैकी 9 लोकांनी काही प्रमाणात आपली दृष्टी गमावली आहे. असे यासाठी आहे, कारण त्यांच्यापैकी अधिक लोकांनी महामारीमुळे लागणाऱ्या लॉकडाऊनच्या दरम्यान नियमितपणे केली जाणारी डोळ्याची तपासणी आणि त्याचा पाठपुरावा करने सोडले आहे.
डायबिटिक रेटिनोपैथी किंवा वयाशी संबंधित मॅक्युलर अध:पतन (डिजेनरेशन) सारख्या रेटिनल रोगांमध्ये सुरुवातीला काही लक्षणे साधारण असतात आणि फक्त डोळ्याच्या तपासणीत किंवा स्क्रिनिंगने देखील याबद्दल माहिती होऊ शकते. अशा परिस्थित वेळेवर डोळ्यांची काळजी घेतली नाही, तर गंभीर स्वरुपाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुंबई रेटिना सेंटरच्या सीईओ विटेरियोरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी यांनी आईएएनएसला म्हणाले, दुर्दैवाने, कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत खराब पाठपुराव्यामुळे 90 टक्के रुग्णांनी काही प्रमाणात आपली दृष्टी गमावली आहे. खासकरुन एएमडीने (एज रिलेटेड मैकुलर डिजनरेशन) पीड़ित रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते. हे रुग्ण जास्त करुन आपले इंट्राविट्रियल इंजेक्शन घेण्यापासून चुकताता (Failure to take intravitreal injection), त्या कारणाने रोग वेगाने वाढतो.
नारायणा नेत्रालय आय इंस्टीट्यूट, बंगळुरुमध्ये सीनियर विटेरियो-रेटिनल कंसल्टेंट डॉ. चैत्र जयदेव यांनी सांगितले, कोविडच्या भितीमुळे, आम्ही मागील 3-4 महिण्यात नियमीत डोळ्याच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये घसरण पाहिली आहे. त्यामुळे याचे निदान आणि उपचार घेण्यावर उशीर आणि परिणाम झाला आहे. ज्यामुळे खुप दिवस बघण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. डॉक्टरांनी सांगितले की, या रोगाला नियंत्रित करण्यासाठी आणि दृष्टीवर कोणताही परिणाम होण्यापासून रोखण्यासाठी सुरुवातीला त्याचे निदान करुन आणि त्याच्यावर उपचार करणे महत्वाचे आहे.
क्लिनिकच्या भेटी जितक्या जास्त काळ बंद असतील तितके डोळ्यांच्या आरोग्यावर अधिक वाईट परिणाम होतील. विट्रेरेटिनल सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. राजा नारायण यांनी आयएएनएसला सांगितले की, "कोविडच्या या लाटेत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. रुग्णांना मॅक्युलर डिजेनेरेशन किंवा डायबेटिक मॅक्युलर एडीमासाठी (Macular degeneration or diabetic macular edema) भेट देण्यास उशीर करू नये, जोपर्यंत रुग्णाला कोविडची लक्षणे दिसत नाहीत. दुदानी पुढे म्हणाले, तिसऱ्या लाटेसह, आम्ही पूर्वीसारखाच पॅटर्न पाहत आहोत, कारण रुग्णांच्या भेटी (रुग्णालयात) विशेषत: वृद्धांमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी घट झाली आहे. डोळयातील पडदा बदलणे शक्य नसल्यामुळे, इंजेक्शन न मिळाल्याने किंवा उपचारांचे पालन न केल्याने डोळ्यांचा आजार वाढू शकतो.
डॉक्टरांनी रुग्णांना टेलीकंसल्टेशन घेण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. अशात दृष्टी परिक्षण (आय टेस्टिंग) आहे. ज्याला कोणीही घरबसल्या करु शकते. तसेच त्याचा रिपोर्ट डॉक्टरांकडे तपासणीसाठी आणि पुढील तपासणी करण्यासाठी पाठवली जाऊ शकते. जयदेव म्हणाले, जर रुग्णांना अंधूक दृष्टी, दृष्टीचे अचानक नुकसान किंवा दृष्टी क्षेत्रात काळे डागासारखे लक्षणांचा अनुभव आला येत असेल, तर त्यांनी तात्काळ डोळ्य़ाची तपासणी करणयासाठी जाणे आवश्यक आहे. कारण हे डायबिटिक रेटिनोपैथीचे लक्षणं असू शकते. अशात गुंतागुंत वाढू नये म्हणून मधुमेहींनी त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात असल्याची खात्री करावी आणि ती नियंत्रणात ठेवावी.