महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

8K Steps Avert Death Risk : नियमित चालल्याने मृत्यूचा धोका होतो कमी, संशोधकांनी केला 'हा' दावा - नियमित व्यायामामुळे मृत्यूचा धोका कमी

चालण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. मात्र आठवड्यातून 8 हजार पावले चालल्यास मृत्यूचा धोका कमी होत असल्याचा दावा जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात करण्यात आला आहे.

8K Steps Avert Death Risk
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 29, 2023, 4:37 PM IST

न्यूयॉर्क : आठवड्यातून किमान 8 हजार पावले चालल्याने मृत्यूचा धोका टाळता येत असल्याचे संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात याबाबतचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 8 हजार पावले चालल्याने आरोग्याला मोठा फायदा होत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

मृत्यू होण्याची शक्यता होते कमी :चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र आठवड्यातून एक किंवा दोन दिवस 8 हजार पावले चालल्याने मृत्यूचा धोका एक ते दोन दिवस कमी होत असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. नियमित व्यायामामुळे मृत्यूचा धोका कमी होतो, हे अनेकदा संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात आठवड्यातून फक्त 6.4 किमी चालल्याने मृत्यूचा धोका कमी करता येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना आहे चालण्याचा फायदा :जपानमधील क्योटो विद्यापीठ आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे. या संशोधकांनी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस 8 हजार पावले चालतात त्या नागरिकांचा 10 वर्षांच्या कालावधीत मृत्यू होण्याची शक्यता 14.9 टक्के कमी असल्याचा दावा केला आहे. काही नागरिक आठवड्यातून 8 हजार पावले तीन ते सात दिवस चालतात त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका आणखी 16.5 टक्के कमी होत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले. आठवड्यातून एक किंवा दोन दिवस 8 हजार पावले चालणाऱ्या 65 वर्षे वयाच्या नागरिकांनाही आरोग्याचे फायदे दिसून आल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

संशोधकांनी मृत्यूच्या आकडेवारीची केली तपासणी :या संशोधकांनी चालणाऱ्या व्यक्तीच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विश्लेषण केले आहे. यातून जास्त चालणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचा धोका कमी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. या निष्कर्षांवरून व्यक्तींना आठवड्यातून फक्त दोन दिवस चालण्याने भरपूर आरोग्याचे फायदे मिळू शकतात, हे स्पष्ट होत असल्याचेही या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले आहे. संशोधनासाठी या संशोधकांनी 2005 आणि 2006 मध्ये 3 हजार 100 सहभागींमधून दररोज चालणांऱ्याची संख्या वापरली. त्यानंतर 10 वर्षांनंतर त्यांच्या मृत्यूच्या डेटाची तपासणी केली. यापैकी 632 सहभागी नागरिकांनी आठवड्यातून 8 हजार पावले किंवा त्याहून अधिक, 532 नागरिकांनी आठवड्यातून एक ते दोन दिवस 8 हजार किंवा त्याहून अधिक पावले आणि 1 हजार 937 सहभागी नागरिकांनी आठवड्यातून तीन ते सात दिवस 8 हजार किंवा त्याहून अधिक पावले चालल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले. नियमित चालण्याने हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोका कमी होत असल्याचा दावा मेयो क्लिनिकच्या वतीने करण्यात आल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा - Wake Up Fresh : शांत झोपेसाठी अशी घ्या काळजी, सकाळ होईल ताजीतवानी

ABOUT THE AUTHOR

...view details