शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी तुमच्या शरीरात नेहमी पुरेसे द्रव आणि इलेक्ट्रोलाइट ( drinks to maintain electrolyte balance ) पातळी असणे आवश्यक आहे. तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स (Soft drinks ) आणि साखरेने भरलेले ज्यूस ( Juice filled with sugar ) घेण्याचा मोह होत असला तरीही, येथे 8 निरोगी पर्यायी पेये ( 8 healthy alternative drinks ) आहेत जे तुम्हाला हायड्रेटेड ( Hydrated ) राहण्यास आणि दिवसभर तुमचे इलेक्ट्रोलाइट संतुलन ( Your electrolyte balance ) राखण्यास मदत करतील. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरातून अनेक प्रकारचे मिनरल्स निघून जातात, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचा वापर करता येतो.
काकडी डिटॉक्स पेय-काकडीचा रस व्हिटॅमिन ए, सी, के, मॅग्नेशियम, सिलिकॉन आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी भरलेले असते. हे एक हायड्रेटिंग आणि अल्कलायझिंग पेय आहे. काकडीचा रस संपूर्ण शरीर स्वच्छ आणि डिटॉक्स करू शकते, तसेच जठराची सूज, ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ, अपचन, अल्सर यांसारख्या पाचक समस्यांना मदत करते. काकडीत अधिक प्रमाणात पाणि असते. म्हणून त्यातून रस काढणे सोपे आहे. या रसाची चव तुम्ही मसाज केल्यानंतर प्यायलेल्या स्पा पाण्याच्या सारखी लागते. हा रस काकडी धुऊन, सोलून पाण्यात मिसळावी जनेकरून तुम्हाला चांगला काकडीचा रस मिळेल. त्यात तुम्ही चिमूटभर मीठ घालावे. तुम्ही तुमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये काकडी आणि पुदिन्याची पाने देखील टाकू शकता.
इलेक्ट्रोलाइट पाणी-इलेक्ट्रोलाइट-इन्फ्युज्ड पाणी कमी-कॅलरी, इलेक्ट्रोलाइट्स बदलण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी प्रभावी आहे. हायड्रेशन आणि खनिज बदलण्यात इलेक्ट्रोलाइट पाण्याची महत्वाची भूमिका असते. तुम्ही तुमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये ताजे चिरलेली किंवा मिश्रित फळे आणि औषधी वनस्पती घालून तुमचे स्वतःचे फ्लेवर्ड, इलेक्ट्रोलाइट-इन्फ्युज्ड पाणी देखील बनवू शकता.
एलोवेरा जूस -कोरफड वनस्पतीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, जर तुम्ही हायड्रेटेड राहण्याची रणनीती करीत असाल तर, तुमच्या आरोग्याला या वनस्पतीचा विविध मार्गांनी फायदा होईल.
हेही वाचा - आरोग्यदायी आहाराने शरीराची दुर्गंधी रोखता येते का?
ताक -ताक आपल्या शरिराला ताजेतवाने ताबडतोब थंड करते. कडाक्याच्या उन्हाळ्यात, एक ग्लास ताक, जिरे, पुदिना, आणि मीठ ताकात टाकून शरीराला थंड ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. या तुम्ही बर्फाचे तुकडे देखील टाकू शकता. बाजारात उपलब्ध असलेल्या कोल्ड्रिंक्सपेक्षा हे एक आरोग्यदायी पेय आहे.