नवी दिल्ली : सध्या देशभरात लग्न सराईचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे दुरवरचे नातेवाईक लग्नाच्या सोहळ्यात एकत्र येतात. त्यातच लग्न सोहळ्यात होणारी धावपळ, लग्नात करायच्या नृत्याची तयारी आदी कारणांमुळे मधुमेहाच्या रुग्णांना काळजी घेणे गरजेचे असते. त्यातही नातेवाईक प्रत्येक वेळा तोंड गोड करा म्हणून लग्न समारंभात गळ घालतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांला लग्न समारंभाचा काळ मोठा कठिण असल्याचे दिसून येतो. अशा नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतची खास माहिती या लेखातून देण्यात येत आहे.
लग्नात मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आव्हान :मधुमेह असलेल्या लोकांसाठी लग्न हा फारच कठीण काळ असल्याचे बोललेजाते. त्यांच्यासाठी समोसे, टिक्की, गुलाब जामुन आणि लाडू याचा सतत पाहुणचार असल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवणे फारच कठीण असते. त्यामुळे लग्न समारंभात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न निवडणे हे मोठे आव्हान असू शकते. मात्र याचा अर्थ असाही नाही की लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी काही खाऊ नये असेच पदार्थ असतील. आपण काही नियोजन करुन आणि योग्य निवड केल्याने उत्सवांमध्ये भाग घेऊन तुमचा मधुमेहावर योग्य नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला रक्तातील साखरेचे अनपेक्षित उच्च किंवा कमी करण्यास मदत होईल. लग्न समारंभाच्या काळात तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काही टिप्स आम्ही देत आहोत. या 7 मधुमेहाच्या टिप्स वापरुन तुम्ही आपला मधुमेह नियंत्रित करू शकता. त्यानुसार लग्नाच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकता.
कृती योजना :लग्न सोहळ्यासाठी तुम्ही दुसर्या शहरात जात असाल, तर या काळात तुमच्या औषधांचे वेळापत्रक, आहार आणि जीवनशैली कशी असावी याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी आधीच बोला. आपत्कालीन परिस्थितीत कृती आराखडा तयार करा. तुम्हाला आवश्यक असलेली औषधे तुमच्या प्रिस्क्रिप्शनसह लग्न सोहळ्यात सोबत घेऊन जा. ती औषधे घेण्यासाठी अलार्म लाऊन ठेवा. आपल्या मित्रांसह कुटूंबियांची मदत घ्या :तुम्ही उपस्थित राहण्यासाठी जात असलेल्या लग्नात आपल्या कुटूंबियांना तुमच्या औषधांच्या बाबत माहिती द्या. तुमच्या मित्रांनाही याबाबतची माहिती देऊन ठेवा. वेळेवर औषधी घेण्यासाठी तुमच्या नातेवाईक आणि मित्रांची मदत घ्या.
लग्नाच्या दिवशी तयार रहा :आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम महत्वाचा असतो. त्यासाठी लग्नाच्या दिवसाची सुरुवात व्यायाम नाहीतर योगाने करा. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहू शकते. व्यायाम केल्यामुळे कॅलरी बर्न होऊ शकतात. त्यामुळे तुमची भूक नियंत्रित राखण्यास मदत होऊ शकते. लग्नाच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी कमी कार्बोहायड्रेट, उच्च फायबर स्नॅक घ्या. काही काजू किंवा आरोग्यदायी स्नॅक सोबत घेऊन लग्न समारंभाची योजना तयार करा.