हैदराबाद : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्जुन कपूर हा चित्रपट सृष्टीत त्याच्या अभिनयापेक्षाही त्याच्या अफेयरमुळे नेहमी चर्चेत असते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोराची जोडी चित्रपट सृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र अर्जुन कपूर हा प्रचंड हेल्थ कॉन्शियस असल्याचेही दिसून येतो. नुकताच त्याने आपला डायट प्लान सोशल माध्यमावर शेअर केला आहे. त्यात त्याने विविध प्रथिनांबाबत माहिती दिली. त्यासह त्याने कोणते जंकफूड खाऊ नये, याबाबतही माहिती दिली. तुम्हालाही फिट रहायचे असेल तर आपल्या खाण्यात प्रोटीन्सयुक्त आहाराचे सेवन करा. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, मच्छी, फळे, बियायूक्त आहार, दही आदी पदार्थांचा आहारात समावेश असल्याने आपले आरोग्य उत्तम राखण्यास फायदेशीर ठरते.
हिरव्या पालेभाज्या : आपल्याला जर आरोग्याला निरोघी ठेवायचे असेल तर आपल्या आहारात दररोज हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहिल.
धान्य : तुम्हाला जर तुमचे आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर आपल्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश असलेले भोजन घ्या. गव्हाचे पीठ, राईचे पीठ, ओटचे जाडे भरडे पीठ, बार्लीचे पीठ, राजगिरा पीठ, क्विनोआ पीठ किंवा मल्टीग्रेन पीठाचा यात समावेश करा. उच्च फायबरयुक्त अन्नाचा आहारात समावेश असल्यास शरीरासाठी तो फायदेशीर आहे.
कडधान्य :आपले आरोग्य जर उत्तम ठेवायचे असेल तर आपल्या आहारात कडधान्याचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या घटकाची हानी भरून निघेल.