एखाद्याच्या सोयीनुसार मधूनमधून उपवास ( Intermittent fasting ) अनेक प्रकारे करता येतो. मधूनमधून उपवास करण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव अनोखा असतो आणि वेगवेगळ्या शैली वेगवेगळ्या लोकांना शोभतील. अधूनमधून उपवास करण्याचा सराव करण्यासाठी पुढील सात भिन्न मार्ग आहेत :
हेही वाचा -स्मार्टफोनच्या अती वापराने तरुणांचे मानसिक आरोग्य होऊ शकते बाधित
1. दिवसाचे 12 तास उपवास -आहाराची मार्गदर्शक तत्त्वे सरळ आहेत. दररोज, एखाद्या व्यक्तीने 12 तास उपवास करण्याचा काळ निवडावा व त्याचे पालन करावे.
काही संशोधकांच्या मते, 10 ते 16 तास उपवास केल्याने शरीरातील चरबीचे संचय ऊर्जेत बदलू शकते, रक्तप्रवाहात केटोन्स सोडल्या जाते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास प्रोत्साहन मिळते.
2. 16 तास उपवास -16:8 पद्धती, ज्याला लिएनगेन्स (Leangains) आहार म्हणूनही ओळखले जाते, त्यात दिवसाचे 16 तास उपवास करणे आणि 8 तास खाणे समाविष्ट आहे. यात पुरुष 16:8 आहारानुसार दररोज 16 तास उपवास करतो, तर महिला 14 तास उपवास करते. 12 तासांचा उपवास करून कुठलाही फायदा न मिळालेल्या व्यक्तीला या प्रकारचे अधूनमधून उपवास करणे फायदेशीर ठरू शकते.
3. आठवड्यातून २ दिवस उपवास -जे लोक 5:2 आहाराचे पालन करतात ते साधारणपणे 5 दिवस खातात आणि नंतर इतर दोन दिवस कॅलरी कमी करतात. या दोन उपवासाच्या दिवसांत पुरुष साधारणपणे 600 कॅलरीज आणि स्त्रिया 500 कॅलरीचे सेवन करतात.
4. अल्टर्नेट डे फास्टिंग -यात अनेक भिन्नता आहेत. ज्यामध्ये प्रत्येक इतर दिवशी उपवास समाविष्ट असतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की, अल्टर्नेट डे फास्टिंगसाठी उपवासाच्या दिवशी घन पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे. तर इतरांचा असा विश्वास आहे की, 500 कॅलरीजचे सेवन केल्या जाऊ शकते. खायच्या दिवशी, बरेच लोक त्यांना पाहिजे तितके खाणे पसंत करतात. अल्टर्नेट डे फास्टिंग हे अधूनमधून उपवासाचे (Intermittent fasting) तीव्र स्वरूप आहे.