हैदराबाद - भारतात कोविड १९ चा पहिला रुग्ण सापडून जवळजवळ १ वर्ष झाले. पण तरीही या विषाणूबद्दलची लोकांच्या मनातली भीती तशीच आहे. सुरुवातीला या विषाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या चिंताजनक होती. आता मात्र डॉक्टरांना या रोगाला कसे हाताळायचे हे कळायला लागले आहे. पण तरीही कोरोना विषाणूच्या नंतरच्या परिणामांची काळजी डॉक्टर्स आणि संशोधकांना वाटत आहे. जरी बाजारात लवकरच कोविड १९ वरची लस उपलब्ध होईल, अशी घोषणा केली गेली आहे, तरीही या विषाणूमध्ये होणारा बदल, त्याच्या लक्षणांमध्ये होणारे बदल आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम यामुळे लोकांना ही लस किती परिणामकारक असेल याबद्दल शंका येत आहे.
कोविड १९ – साथीचा रोग
कोविड १९ चा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात सापडला होता. तिथूनच हा रोग सगळ्या देशांमध्ये पसरायला सुरुवात झाली. लोक इतर देशांत प्रवास करत होते, त्यामुळे अगदी महिन्याभरात या साथीच्या रोगाने जगभर हाहाकार माजवला. सुरुवातीला या रोगाला 'SARS-CoV-2' हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर कोविड १९ (Covid-12480019) किंवा कोविड विषाणू आजार २०१९ असे नाव दिले गेले. या आजारात प्रथम सर्दी, खोकला आणि तीव्र ताप असायचा. ही लक्षणे दिसली की कोरोना झाला असे लक्षात यायचे. पण जसा हा आजार आणखी प्रगत झाला, तशी लक्षणे बदलत गेली. श्वास घ्यायला त्रास, वास आणि चव न कळणे ही लक्षणेही दिसू लागली. त्यानंतर जुलाब, डोकेदुखी आणि शरीरात वेदना, कमालीचा अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणेही समोर आली. या वर्षी कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा बळी गेला आणि हा आजपर्यंतचा सर्वात गंभीर साथीचा रोग मानला जात आहे. या आजाराने जगण्याची शैली पूर्णपणे बदलली. मानसिकही किंवा शारीरिकही. विषाणूचा परिणाम जगभरातील प्रत्येकावरच मोठ्या प्रमाणावर झाला. शारीरिक अंतर कायम ठेवण्याबरोबरच, मास्क घालणे आणि हात आणि वस्तूंची सतत स्वच्छता करणे हे प्रत्येकासाठी महत्वाचे बनले.
अनेक आजार असलेल्या व्यक्तींवर कोविड १९ चा परिणाम
ज्या व्यक्तींना हृदय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग इत्यादी आजार आहेत, त्यांच्या आरोग्यावर कोविड १९ चा परिणाम सर्वात जास्त झाला. अशा प्रकारचे आजार असणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती तशीही कमी असते आणि सर्वात वाईट म्हणजे कोरोना विषाणू रोगप्रतिकारक यंत्रणेवर थेट हल्ला करतो. या लोकांना कोविड रोगाचा धोका जास्त असतो. आता हृदयरोग असणाऱ्यांचेच पाहू. मिळालेल्या माहितीनुसार २०२० मध्ये हृदयरोगाचे रुग्ण आधीपेक्षा जास्त वाढले. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेल्या माहितीनुसार, या वर्षी जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने झालेले मृत्यू हे गेल्या २० वर्षांतल्या मृत्यूपेक्षा सर्वाधिक आहेत. आकडेवारीनुसार हृदयविकारामुळे मृत्यूची संख्या १६ % आहे.
फुफ्फुसे आणि श्वसन प्रणालीवर परिणाम
सुरुवातीपासूनच कोरोना हा श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसांशी संबंधित एक रोग मानला जात आहे. कारण त्याची लक्षणे फ्लू आणि न्यूमोनियासारखीच होती. एखाद्या व्यक्तीला हा आजार झाल्यास त्याच्या फुफ्फुसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अनेक लोकांनी श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे सांगितले आणि कोरोना रुग्णांमध्ये फुफ्फुसाचे गंभीर आजार झाल्याचीही नोंद आहे. रुग्णांची फफ्फुसे कार्य करेनाशी झाली. व्हेंटिलेशन आणि गॅस एक्सचेंज यावर परिणाम झाला. रुग्णाला जास्त ऑक्सिजन पुरवला गेला. एवढेच नाही तर कोरोनातून बरे झाल्यानंतरही लोकांच्या श्वसन प्रणालीवर दीर्घकाळापर्यंत गंभीर दुष्परिणाम होत आहेत, हे चिंतेचे कारण आहे.
पचनसंस्था आणि स्वादुपिंडावर परिणाम