मुलाचे वर्तन आणि त्याच्या व्यक्तिमत्वासाठी सामान्य: लोक त्याच्या संगोपनाला जबाबदार मानतात. अनेकदा पालक मुलांना बोलून चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तुम्हाला माहिती आहे का? मुले शिकवून नव्हे तर, आपल्या आई-वडिलाचे वर्तन आणि आजुबाजूच्या परिस्थितीपासून चांगल्या आणि वाईट गोष्टी शिकतात आणि आत्मसात करतात.
पूर्वीच्या काळी लोक बहुतांश संयुक्त कुटुंबात राहात होते, जेथे घरात केवळ आई - वडीलच नव्हे तर, आजी - आजोबा, काका - काकू आणि बरेच भाऊ - बहिणीही असायचे. अशात मुलांच्या संगोपणाची जबाबदारी, त्यांना चांगल्या बाबी आणि योग्य वर्तन शिकवण्याची जबाबदारी केवळ त्यांच्या आई - वडिलांचीच नव्हे तर, घरातील सर्व सदस्य या कामात भाग घ्यायचे. मात्र, आजच्या काळात बहुतेक लोक न्युकलिअर कुटुंबात राहतात, अशात योग्य पॅरेंटिंग कशी असते, याबाबत बहुतांश पालकांच्या, विशेषत: नवीन पालकांच्या मनात प्रश्न असतात.
वरिष्ठ मनोचिकित्सक डॉ. वीणा कृष्णन सांगतात की, मुले आई - वडिलांना बोलून जे शिकवायचे आहे ते शिकले नसले तरी, बहुतांश गोष्टी ते आपल्या आई - वडिलांना पाहून शिकतात. त्यामुळे, पालकांचे परस्पर वर्तन सकारात्मक, आदरणीय आणि आनंददायी असावे, तरच मुले आनंदी बालपण जगू शकतील.
चांगली पॅरेंटिंग कशी असावी, याबाबत वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळे टिप्स देतात, ज्यातील काही पुढील प्रमाणे आहेत,
1) तज्ज्ञांच्या मते, पालकांनी नेहमी घरातील वातावरण आदरणीय, आनंददायी आणि सकारात्मक बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. चांगल्या निरोगी वातावरणात मुलांमध्ये आनंद, सम्मान, संतुष्टी आणि सुरक्षेची भावना निर्माण होते.
2) मुलांबरोबर नियमित दर्जेदार वेळ घालवला पाहिजे, त्यांच्यासोबत बोलले पाहिजे. विशेषत: त्यांचे बोलने ऐकले पाहिजे. असे केल्याने पालक आणि त्यांच्या मुलांमधील संबंध आणि प्रेम अधिक बळकट होते.
3) तुमच्या मुलाची चांगली वृत्ती किंवा सकारात्मक वर्तनावर अधिक लक्ष दिले पाहिजे. पालक जितके अधिक आपल्या मुलाला त्याच्या वाईट वर्तनासाठी रागवणार, तेवढेच तो त्याकडे आकर्षित होईल. याला पॅरेंटिंगच्या भाषेत नकारात्मक वृत्ती किंवा निगेटिव्ह अॅपरोच म्हणतात. रागवण्याऐवजी मुलाला चांगले आणि वाईट यातील फरक सांगा. मात्र, बाब अधिक गंभीर असेल तर रागवणे देखील म्हत्वाचे आहे, पण रागवताना अपशब्द किंवा अपमानजन शब्दांचा वापर होऊ नये.