यवतमाळ -मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे विलगीकरणात ठेवलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नगरहून परत आल्यानंतर मारेगाव आरोग्य विभागाने गोंडबुरांडा जिल्हा परिषद शाळेत या युवकाला ठेवले होते. रामा विठ्ठल आत्राम (25, रा.गोंडबुरांडा) असे या युवकाचे नाव आहे. त्याने गावानजिक तलावाजवळ पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
यवतमाळमध्ये विलगीकरणात ठेवलेल्या युवकाची गळफास लावून आत्महत्या - social distancing
दोन दिवस एकांतवासात काढल्यावर यातील रामा आत्राम हा 14 मेच्या दुपारी 12 वाजतापासून बेपत्ता होता. याची कल्पना पोलीस पाटील आणि प्रशासनाला देण्यात आली. मृत रामा आत्राम याची विधवा आई व दोन लहान भावंडे दोन दिवसांपासून मृताचा सर्वत्र शोध घेत सारखी भटकंती करत होते. परंतु तो सापडत नव्हता.
गोंडबुरांडा येथील मृत रामासह हनुमान अय्याजी आत्राम (20) आणि सुरेश अरुण आत्राम (21) हे दोघे तरुण अहमदनगर येथील खासगी कंपनीत मजूर म्हणून कामाला होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने हे तिघेही नगरमध्ये अडकून पडले होते. मजुरांना गावी जाण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर हे तिघेही बसने यवतमाळ व मारेगाव येथे आले. तालुका प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करून गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत तिघांनाही विलगीकरणात ठेवले होते. गावात विलगीकरणात ठेवल्यावर गावातील नागरिक आणि कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने त्यांच्याजवळ येत नव्हते. मात्र, त्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येत होत्या.
दोन दिवस एकांतवासात काढल्यावर यातील रामा आत्राम हा 14 मेच्या दुपारी 12 वाजताच्या दरम्यान विलगीकरणातील ठिकाणाहून शौचाला जातो म्हणून निघून गेला होता. मात्र, तो परत आला नाही. याची कल्पना पोलीस पाटील आणि प्रशासनाला देण्यात आली. मृत रामा आत्राम याची विधवा आई व दोन लहान भावंडे दोन दिवसांपासून मृताचा सर्वत्र शोध घेत सारखी भटकंती करत होते. परंतु तो सापडत नव्हता. आज गावातील शेतकरी जनावरे पाणी पाजण्यासाठी गावानजिकच्या तलावावर गेला असता, त्याला पळसाच्या झाडाला झुडपांआड फास लावलेला मृतदेह आढळला. याची माहिती गावात पसरताच मृताची आई आणि दोन्ही भावांनी एकच हंबरडा फोडला. या सर्व प्रकारात तालुका प्रशासनाने दाखविलेल्या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांत प्रचंड रोष दिसून येत आहे.