यवतमाळ- साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरुद्ध तरुणाने आक्षेपार्ह लिखाण करुन ती पोस्ट सोशल मीडिया साईटवरून प्रसारित केली. त्यामुळे उमरखेड पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम माने असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
साध्वी प्रज्ञा सिंहविरुद्ध फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण; तरुणाविरोधात गुन्हा
साध्वी प्रज्ञा सिंह यांना देशद्रोही संबोधित करत अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्यामुळे उमरखेड पोलीस ठाण्यात शुभम मानेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह
शुभमने साध्वी प्रज्ञा सिंह यांना देशद्रोही संबोधित करत अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. तो उमरखेड येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध हदगाव येथील संतोष टोपाजी देवकर यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून शुभम माने या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.