यवतमाळ - जुन्या वादाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील विठ्ठलवाडी भाजी मंडई परिसरात सोमवार (दि. १०) रात्रीच्या सुमारास घडली. आरिफ शहा (३०) वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
डॉग स्कॉड, फिंगर एक्सपर्ट आदी घटनास्थळी दाखल -
या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली.