आर्णी मोबाईल चोरीचा खोटा आरोप False accusation of mobile theft केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नोकराने हॉटेल मालकाच्या पुतण्याच्या डोक्यात दगड घालून Young murder stoning Arni Yavatmal गंभीर जखमी केले. दरम्यान, आज मंगळवारी त्याचा वर्धा जिल्ह्यातील मेघे सावंगी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही गंभीर घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत Youth killing APMC area Arni 22 ऑगस्टच्या रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. रिजवान बेग कय्युम बेग 39 वर्षे, राहणार मुबारकनगर, आर्णी असे निर्घृण खून Yavatmal Mobile Theft Dispute झालेल्या तरुणाचे नाव आहे. Young stoned due to mobile theft dispute Yavatmal
चोरीचा खोटा आरोप केल्याने संताप अनावररिजवान हा येथील बाजार समितीलगत असलेल्या काकाच्या हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा गाडा ओढायचा. सोमवारी बाजाराचा दिवस असल्याने हॉटेलात दिवसभरच ग्राहकांची रिघ होती. ग्राहक सांभाळण्यात व्यस्त असलेल्या रिजवानची नजर चुकवून सायंकाळी त्याचा मोबाईल कुणीतरी चोरला. ही बाब लक्षात येताच रिजवानने मोबाईलचा शोध घेतला. मात्र, मोबाईल मिळाला नाही. तेव्हा त्याने दुकानातील नोकर सैय्यद बाबु सैय्यद गफुर रा. महाकाली चौक याच्यावर मोबाईल चोरीचा आरोप केला. त्यामुळे त्यांच्यात चांगलाच वाद झाला. परिसरातील व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी त्यांचा हा वाद मिटविला. दरम्यान, रात्री नेहमीप्रमाणे रिजवान जेवण करून हॉटेलातच झोपी गेला. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास आरोपी नोकर सैय्यद बाबू हा हॉटेलमध्ये आला. यावेळी त्याने संतापाच्या भरात रिजवानच्या डोक्यावर दगड घातला. एवढ्यावरच तो थांबला नाहीतर त्याने अनेकदा तो दगड त्याच्या डोक्यात घातला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन रिजवान रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.