यवतमाळ -महागाव तालुक्यातील पूस नदी काठावर तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली. मनोज वाठोरे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्याचा विवाह झाला होता.
महागाव तालुक्यात तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात - yavatmal latest news
महागाव तालुक्यातील पूस नदी काठावर तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महागाव तालुक्यात तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
महागाव तालुक्यात तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
खून झाल्याची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटना स्थळाचा पंचनामा केला. यावेळी पूस नदी काठावर नागरिकांनी गर्दी केली होती. मृताच्या शरीरावर सात घाव आहेत. खून प्रकरणात संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. खुना मागील कारण कळू शकलेले नाही. पुढील तपास महागाव पोलीस करत आहेत.