यवतमाळ - जिल्ह्यातील पाळुवाडी येथील एका युवकाने गावाजवळ असलेल्या पुलाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हरिदास कुरकुटे (वय - 33) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पाळुवाडी येथील युवकाची गळाफास घेऊन आत्महत्या - मृतदेह
जिल्ह्यातील पाळुवाडी येथील हरिदास भिकाजी कुरकुटे (वय - 33) या युवकाने गावाजवळ असलेल्या मेन रोडच्या नाल्यावरील पुलाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाळुवाडी येथील युवकाची गळाफास घेऊन आत्महत्या
घटनास्थळ
हरिदास कुरकुटे या युवकाने गावाजवळच असलेल्या मेन रोडच्या नाल्यावरील पुलाला गळफास घेतला आहे. आज सकाळच्या सुमार ही घटना निर्दशनास आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोफाळी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे कारण मात्र, अद्यापही समजू शकले नाही.