यवतमाळ -यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात रेती तस्कर अक्षय राठोड टोळीचा सदस्य असलेल्या करण परोपटे याच्यावर अज्ञात दोन ते तीन जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी केवळ गोळीबारच केला नाही, तर त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला देखील करण्यात आला आहे. या हल्ल्यात करण परोपटे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
यवतमाळमध्ये तरुणावर गोळीबा रेतीघाट तस्करीच्या वादातून हल्ला?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, करण परोपटे हा येथील स्टेट बॅंक चौकात आला होता. यावेळी त्याच्या मागावर असलेल्या तीन ते चार जणांनी करणवर अंदाधुंद गोळीबार केला, गोळीबारासह त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला देखील करण्यात आला. त्याच्या पोटात व छातीमध्ये चार गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. हल्ल्यात करण परोपटेचा मृत्यू झाला आहे. तर बंदुकीतून निघालेली एक गोळी ही आणखी एकाच्या पायाला लागल्याने त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला रेतीघाट तस्करीच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वडगाव पोलीस ठाण्याचे मनोज केदारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश