यवतमाळ - पैशाच्या वादातून युवकाचा खून झाल्याच्या घटनेने घाटंजी येथे खळबळ उडाली आहे. घाटंजी शहरातील घाटी परिसरात मृत स्वप्निल भोयर (वय 30) याने बालू राऊत नामक व्यक्तीला दगड मारल्यामुळे जखम झाली होती. त्यामुळे बालू राऊत याने उपचारासाठी स्वप्निलला पैशांची मागणी केली होती. पण स्वप्निलने पैसे देण्यास नकार दिला.
पैशांच्या वादातून युवकाचा खून; घाटंजी येथील घटना - घाटंजी स्वप्निल भोयर खून
पैशाच्या वादातून युवकाचा खून झाल्याच्या घटनेने घाटंजी येथे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी गोपाल गिनगुले, अजय भेदुरकर. बालू राऊत यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड केले आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.

घाटंजीत पैशांच्या वादातून युवकाचा खून
यानंतर बालू राऊत व त्याचे दोन मित्र गोपाल गिनगुले व अजय भेदूरकर यांनी मिळून स्वप्निलला काठी व बुक्यांनी मारहाण केली. यात तो गंभीर झाल्यामुळे उपचारासाठी त्याला यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान स्वप्निलचा म्रुत्यू झाला. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी गोपाल गिनगुले, अजय भेदुरकर. बालू राऊत यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड केले आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.