यवतमाळ : वणी तालुक्यातील घोंसा येथील देवीचा विसर्जन करण्याकरता गेलेला इसम वाहून गेल्याची घटना घडली. राजू श्रीहरी बोरकुटे (50) असे या माणसाचे नाव असून ही घटना शनिवारी रात्री घडली.
रेस्कयू टीम दाखल
मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर पकडल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहे. यवतमाळ येथील रेस्क्यू टीम घोन्सा येथे दाखल झाली असून सकाळी आठ वाजता पासून विदर्भा नदीत शोधमोहीम सुरू केली आहे. अद्यापही त्याचा थांगपत्ता लागला नाही. घटनेची माहिती पडताच तहसीलदार विवेक पांडे, पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, उपविभागीय अधिकारी शरद जवाळे घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा -आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ, सकाळी एका तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्र