महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; अर्जुना उड्डाण पुलावरील घटना - News about Yavatmal accident

यवतमाळमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या विषयी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

young-man-dies-in-truck-accident-in-yavatmal
ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By

Published : Jan 21, 2020, 12:29 PM IST

यवतमाळ - भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना अर्जुना येथील उड्डाण पुलावर घडली. गजानन पांडे (27, रा. वारज) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

गजानन पांडे कामानिमित्त चापडोह येथे आला होता. तेथून परत चापडोहवरून बोथबोडनमार्गे वारज येथे जाण्यासाठी निघाला. बोथबोडन फाट्यावरील डिव्हायडरजवळ रस्ता सोडण्यात आलेला नाही. त्यामुळे गजानन पुढे निघून गेला. अर्जुना उड्डाण पुलावरून वळत असताना भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पळ काढला. ही घटना काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी रामभाऊ नामदेव पारधी (रा. वारज) यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details