यवतमाळ- मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथे युवकाचा मृतदेह आढळला आहे. गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरज प्रवासी निवाराच्यामागे शुभम अनिल झाडे (२१) याचा मृतदेह आढळला. गावात शुभमचा खून झाल्याची चर्चा आहे. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप उघडकीस आले नाही.
गोरज फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळला; कारण अस्पष्ट - अस्पष्ट
गावात शुभमचा खून झाल्याची चर्चा आहे. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप उघडकीस आले नाही.

मागील काही दिवसांपासुन शुभम औरंगाबाद येथील कंपनीत कार्यरत होता. गावातील संबंधितांच्या लग्नाप्रसंगी वनोजादेवी येथे २ दिवसापूर्वी तो आला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना बुधवारी रात्रीपासून शुभम अचानक बेपत्ता झाला होता. दरम्यान, नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, शुभमचा त्यांना पत्ता लागला नाही.
गुरुवारी सकाळी शेत शिवारात कामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना गोरज प्रवासी निवाऱ्यामागे शुभमचा मृतदेह रक्तांनी माखलेल्या अवस्थेत आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली. शुभमच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नाही. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे.