यवतमाळ - आपल्या जीवनात योगाचे किती महत्त्व आहे, याचे महत्व पटवून देणारे शहरातील ९० वर्षाचे आजोबा एक मुर्तीमंत उदाहरण आहेत. नामदेवराव बानोरे असे या आजोबांचे नाव आहे. त्यांचा या वयातील व्यायाम आणि योगासणे करण्याचा उत्साह पाहिला तर ते तरुणाई देखील अचंबित होईल, असा व्यायाम ते अगदी सहजगत्या करतात. योगा हे त्यांच्या फिटनेसचे गुपित आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते नियमित स्वरूपात योगा करतात. रोज सकाळी ते पद्मासन घालून सुमारे अर्धा तास बसतात. पद्मासन हा एक योगाचा प्रकार आहे.
योगादिन विशेष; योगामुळे नव्वदीतही आहेत चिरतरुण 'नामदेवराव बानोरे' - अनन्यसाधारण
या आजोबांनी देशात आणि विदेशात प्रौढांच्या ज्या स्पर्धा भाग घेतला आहे. त्यात १०० मीटर, २०० मीटर धावणे, गोळा फेक, भालाफेक अशा अनेक स्पर्धांमध्ये पन्नासच्यावर सुवर्णपदके मिळवलेली आहेत. जीवनात जे काय मिळवलं आहे ते योगाची देण आहे असे ते आवर्जून सांगतात.
या आजोबांनी देशात आणि विदेशात प्रौढांच्या स्पर्धेतही भाग घेतला आहे. त्यात १०० मीटर, २०० मीटर धावणे, गोळा फेक, भालाफेक अशा अनेक स्पर्धांमध्ये पन्नासच्यावर सुवर्णपदके मिळवलेली आहेत. जीवनात जे काय मिळवलं आहे ते योगाची देण आहे, असे ते आवर्जून सांगतात.
प्रत्येकाच्या जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे, यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. आरोग्य हीच संपत्ती म्हणजे निरोगी शरीर हेच सर्वांत मोठी संपत्ती आहे. त्यामुळे लहानपणापासूनच सर्वांनी योगा करावा असे ते सर्व आबालवृद्धांना सांगतात.