महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळच्या कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा, 78 लोकांचे नमुने चाचणीसाठी पाठवले नागपूर प्रयोगशाळेत - यवतमाळ कोरोना न्यूज

पॉझिटिव्ह असलेल्या आठही जणांची प्रकृती चांगली असून त्यांना लक्षणे नाही. तसेच त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

यवतमाळच्या कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा
यवतमाळच्या कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा

By

Published : Apr 10, 2020, 1:54 PM IST

यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 88 जण भरती आहेत. यापैकी पॉझिटिव्ह असलेल्या आठही जणांची प्रकृती चांगली असून त्यांना लक्षणे नाही. तसेच त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली. भरती असलेल्या एकूण 88 रुग्णांपैकी 78 नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. यात काल निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांच्या नमुन्यांचासुध्दा समावेश आहे.

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह

पॉझिटिव्ह रुग्ण हे शहरातील जाफर नगर, इंदिरा नगर, मेमन सोसायटी, गुलमोहर कॉलनी तसेच नेर, बाभूळगाव व सावर येथे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रशासनाला आतापर्यंत अशा 47 लोकांचा शोध घेण्यास यश आले असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात येईल. तसेच त्यांचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथे शुक्रवारी पाठविण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आणखी काही लोक आले असतील तर त्यांनी स्वत:हून यंत्रणेसमोर यावे व आरोग्य तपासणी करून घ्यावी. जेणेकरून स्वत:च्या आणि इतरांच्याही आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य राहील व या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रतिबंध करता येईल, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यवतमाळ शहरातील प्रतिबंध करण्यात आलेल्या भागासाठी प्रत्येकी 30 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तीन टिम तयार करण्यात आल्या आहेत. या भागात 6827 घरे असून 33045 लोकसंख्या आहे. आरोग्य विभागाच्या टीममार्फत 'डोअर टू डोअर' सर्व्हे करून सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . खोकला, ताप, श्वसनाचा त्रास किंवा कोव्हिड संदर्भात इतर एक-दोन लक्षणे आहे काय, याबाबत पुढील 14 दिवस हा सर्वे या भागात सुरू राहील. कोव्हिड-19 चे हे युध्द जिंकण्यासाठी सर्व नागरिकांना शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे व सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे अंमलात आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे. जिल्ह्यात 97 जण गृह विलगीकरणात असून 11 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details