महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्हाधिकारी ऑनफील्ड; कोरोनाच्या उपाययोजनांची घेताहेत माहिती - यवतमाळ जिल्हाधिकारी

दिग्रस तालुक्यातील इसापूर, रुईतलाव, मरसूळ या तीन गावांतून कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने हा भाग प्रतिबंधित केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटर या उपकरणांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी केली जाते की नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: खात्री करून घेतली.

Yawatmal collecter
यवतमाळ जिल्हाधिकारी ऑनफील्ड; कोरोनाच्या उपाययोजनांची घेताहेत माहिती

By

Published : Jun 6, 2020, 9:06 PM IST

यवतमाळ - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरातून ग्रामीण भागाकडे होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची शासकीय यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, तसेच येथील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत काय काळजी घ्यावी, यासाठी जिल्हाधिकारी प्रतिबंधित क्षेत्रात 'ऑनफिल्ड' आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी महागाव, नागापूर, दिग्रस आदी ठिकाणी भेटी दिल्या.

दिग्रस तालुक्यातील इसापूर, रुईतलाव, मरसूळ या तीन गावांतून कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने हा भाग प्रतिबंधित केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटर या उपकरणांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी केली जाते की नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: खात्री करून घेतली. या क्षेत्रात विशेष काळजी घेऊन स्वच्छता ठेवावी, यात कोणताही हलगर्जीपणा करू नका, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

याशिवाय गावकर्‍यांच्या दैनंदिन समस्या, खरीपाची तयारी, पेरणीचे नियोजन, पीक कर्ज आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच तालुकास्तरीय कोरोना सनियंत्रण समितीची बैठक घेऊन पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले.

गावागावात मनरेगा अंतर्गत कामे मंजूर करून जास्तीत जास्त मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नागरिकांना मोफत धान्य वाटप त्वरीत करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details