महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये रस्त्यातील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून युवक काँग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध - सेना-भाजप मंत्र्यांच्या गाड्यांवर चिखलफेक

अनेक वर्षांपासून दिग्रस शहरासह मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेकवेळा निवेदने देऊनही रस्त्यांची कामे झाली नाहीत, त्यामुळे युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावण्यात आली.

रस्त्यातील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून युवक काँग्रेसने केला भाजप सरकारचा निषेध

By

Published : Aug 14, 2019, 7:24 PM IST

यवतमाळ -दिग्रसमध्ये युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावण्यात आली. संघटनेच्या सदस्स्यांनी यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

रस्त्यातील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून युवक काँग्रेसने केला भाजप सरकारचा निषेध
मागील अनेक वर्षांपासून दिग्रस शहरासह मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होतात. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली, रस्तारोकोही करण्यात आला. मात्र, भाजप-सेना सरकार बेशर्मासारखे वागत आहे. म्हणून सेना-भाजप सरकारच्या विरोधात रस्त्यात बेशरमाचे झाड लावून निषेध करण्यात आला. तसेच दिग्रस-दारवा रस्त्यासह इतर रस्ते लवकर बनवले नाही. तर या रस्त्यावरून येणाऱ्या सेना-भाजप मंत्र्यांच्या गाड्यांवर चिखलफेक करून आंदोलन करण्याचा इशारा यवतमाळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजा चव्हाण, मुरलीधर कांबळे, अरबाज धारीवाला, फैजल पटेल, मोनू मक्तेदार, विजय गुघाने, जमील खान, सोहेल शेख, बाबा पटेल, रमेश पटेल, अहमद अली शौकत अली हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details