यवतमाळ - वणी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर छापा टाकून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी रात्री वणी पोलिसांनी ही कारवाई केली.
यवतमाळच्या वणीमध्ये सुगंधित तंबाखूवर छापा, दोन आरोपींसह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त - VANI POLICE ACTION ON ILLEGAL TOBACCO
वणी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर छापा टाकुन तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी रात्री वणी पोलिसांनी ही कारवाई केली.
![यवतमाळच्या वणीमध्ये सुगंधित तंबाखूवर छापा, दोन आरोपींसह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त YAVATMAL TOBACCO ACTION](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9368446-813-9368446-1604058181477.jpg)
वणी पोलिसांची कारवाई
जगन्नाथ बाबा मंदिरकडून एक मालवाहू ऑटोमध्ये सुगंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून डीबी पथकाने सापळा रचला. जगन्नाथ बाबा मंदिराकडून येणाऱ्या मालवाहू वाहनाला थांबवून त्याची तपासणी केली. तेव्हा त्या वाहनातून दोन लाख 91 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी राजू नारायण येमूलवार व सनी उर्फ भाई पटेल या दोघांना अटक करण्यात आली.
हेही वाचा -प्रसारमाध्यमांनी आपल्या मर्यादेत राहून वार्तांकन करावे - उच्च न्यायालय