यवतमाळ -पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री यांचे नाव समोर येत आहे. समाज माध्यमांमध्ये फिरत असलेले ऑडिओ क्लिप या तथाकथित आहे. मृत पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली नाही किंवा स्टेटमेंट दिले नाहीत. मंत्रिमहोदयांना यातून बदनाम करण्याचा विरोधकांचा कट असल्याचा आरोप यवतमाळ येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केला आहे.
'सर्व आरोप बिनबुडाचे; ऑडिओ क्लिपची वैधता कुठेही नाही' - यवतमाळ मंत्री संजय राठोड बातमी
मागील दोन-तीन दिवसापासून समाजमाध्यमात ऑडिओ क्लिप फिरत आहेत. या क्लिपची प्रथम वैधता तपासणी गरजेचे आहेत. ही क्लिप कायदेशीररित्या तपासण्याचे काम पोलिसांचे आहे. ही क्लिप योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरविण्याचे काम समाजाचे नसून ज्यांचे आहे त्यांनी करायला पाहिजे. यावर आपले मत मांडून तर्क वितर्क लावून आपले मत मांडणे चुकीचे आहे.
सर्व आरोप बिनबुडाचे; ऑडिओ क्लिपची वैधता कुठेही नाही
तथाकथित ऑडिओ क्लिपद्वारे मंत्र्यांवर अविश्वास दाखवणे चुकीचे
राजकीय, सामाजिक, आरोग्य, रोजगार क्षेत्रात मंत्री महोदय यांचे काम मोठ्या प्रमाणात आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात आणि विदर्भातही त्यांनी केलेले काम हे आदर्शवत आहे. त्यामुळे अशा तथाकथित ऑडिओ क्लिपद्वारे मंत्र्यांवर अविश्वास दाखवणे हे चुकीचे आहे.
Last Updated : Feb 13, 2021, 5:39 PM IST