यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचे तीन संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. गर्दी टाळण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
CORONA : न्यायालयीन व्यवस्था ढासळली; गर्दी टाळण्यासाठी कामकाजाच्या वेळेत बदल - जिल्हा सत्र न्यायालय yavatmal
जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, मॉल, सिनेमागृह ही गर्दीची ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा न्यायालयात दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी न्यायालयाने आपल्या वेळेत बदल केला आहे.
CORONA : न्यायालयीन व्यवस्था ढासळली; गर्दी टाळण्यासाठी कामकाजाच्या वेळेत बदल
जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, मॉल, सिनेमागृह ही गर्दीची ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा न्यायालयात दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी न्यायालयाने आपल्या वेळेत बदल केला आहे. पक्षकारांना तारीख दिली जात आहे. आजारी व्यक्ती असल्यास त्याला परत घरी पाठविले जात आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.