महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; संचारबंदीचे आदेश जारी - Yavatmal Restrictions news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुकाने बाजारपेठा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत सुरू असलेले नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय सर्वप्रकारचे खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहे.

यवतमाळ
यवतमाळ

By

Published : Feb 18, 2021, 10:17 PM IST

Updated : Feb 19, 2021, 2:24 PM IST

यवतमाळ- मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संचारबंदीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम सभा, बैठका, लग्न समारंभ, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर आणि घराच्या परिसरात रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सामाजिक अंतराचे पालन आणि ५० व्यक्तिंची मर्यादा घालण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुकाने बाजारपेठा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत सुरू असलेले नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय सर्वप्रकारचे खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहे.मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचेहऱ्यावर मास्क न लावणे सामाजिक अंतर न ठेवणे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांना, पहिल्यांदा आढळल्यास पाचशे रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 750 रुपये दंड, तिसऱ्यांदा आढळल्यास हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
Last Updated : Feb 19, 2021, 2:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details