महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुमच्या बहिणीला वाढदिवसाचे गिफ्ट द्या, भावना गवळींचे आवाहन

भावना गवळींनी बोलताना मतमोजणीची तारीख ही २३ मे असून या दिवशी माझा वाढदिवस आहे. त्यामुळे मी इथे असलेले माझे बंधू संजूभाऊ, मदनभाऊ यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करून वाढदिवसाचे गिफ्ट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

By

Published : Mar 23, 2019, 9:22 PM IST

तुमच्या बहिणीला वाढदिवसाचे गिफ्ट द्या, भावना गवळींचे आवाहन

यवतमाळ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पाचव्यांदा निवडणूक लढवणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ आज यवतमाळ येथील संदीप मंगलममध्ये भाजप-सेनेच्या संयुक्त पदाधिकारी-लोकप्रतिनिधी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अशोक उईके, माजीमंत्री राजाभाऊ ठाकरे यांच्यासह यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

तुमच्या बहिणीला वाढदिवसाचे गिफ्ट द्या, भावना गवळींचे आवाहन

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरेंची टक्कर तुमच्याशी नसून माझ्याशी आहे. ज्यांना मी ३ वेळा पराभूत केले, ते त्यानंतर मागच्या दरवाज्याने आले. आता ते पुन्हा समोरा-समोर निवडणुकीच्या मैदानात आले आहेत. यामुळे ही तुमची लढाई नसून माझी लढाई असल्याचे त्यानी सांगितले. भावना गवळींनी बोलताना मतमोजणीची तारीख ही २३ मे असून या दिवशी माझा वाढदिवस आहे. त्यामुळे मी इथे असलेले माझे बंधू संजूभाऊ, मदनभाऊ यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करून वाढदिवसाचे गिफ्ट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री मदन येरावार यांनी बोलताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बिनधास्त राहू नये. ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही जागा जिंकायची असून कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details