यवतमाळ - स्थानिक गुन्हे शाखेने धारदार शस्त्रे घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस मंगळवारी मध्यरात्री शहरातील गोधणी रोड परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपयांच्या आठ दुचाक्या जप्त
सण आणि उत्सवाची शहरात धामधूम असताना कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच सऱ्हाईत गुन्हागारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर हे त्यांच्या पथकासह शहर परिसरात गस्त घालीत होते. यावेळी काही संशयित व्यक्ती गोधणी रोडवरील जसमीत अपार्टमेंटसमोर तोंडाला रुमाल बांधून संशयास्पद स्थितीत बसलेले असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी राजू किसन वाघाडे (35, रा. पाटीपुरा), कृष्ण उर्फ कान्हा मारोती घोसळकर (28, रा. सिंघानिया नगर), समीर उर्फ टुप्पी घनश्याम कुसराम (29, रा. सिंघानिया नगर), रुपेश उर्फ टावर बाबाराव गजलवार (38, रा. निखील नगर, उमरसरा) आणि सुरज उर्फ लहाण्या गजानन मोहोड (34, रा. मोठे वडगाव) यांना ताब्यात घेतले. यावेळी सदर आरोपींकडून पोलिसांनी दोन चाकू, एक खंजर, एक लोखंडी रॉड, एक बांबूची काठी, नायलॉन दोरी, मिरची पावडर व एक बंदूक, असे साहित्य जप्त केले. सर्वांविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
लाचप्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक; २५ हजारांसह शरीर सुखासाठी तीन मुलींची केली होती मागणी