यवतमाळ - ज्यांच्या मतावर निवडून आलो त्या सर्वसामान्य माणसांना या अडचणीच्या काळात मदत करणे, ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. मात्र, त्याही पलीकडे जाऊन सामाजिक संवेदना जपत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड अहोरात्र काम करत आहेत. त्यांची ही धडपड पाहुन त्यांचे कुटुंबीयदेखील आता लोकसेवेसाठी पुढे सरसावले आहे.
कौतुकास्पद : पालकमंत्री संजय राठोडांचे अख्खे कुटुंब नागरिकांच्या सेवेत - पालकमंत्री संजय राठोडांचे कुटुंब नागरिकांच्या सेवेत
लॉकडाऊनचा कालावधी अनेक गरीब कुटुंबाची परीक्षा घेणारा ठरत आहे. तर त्यांना मदत करताना लोकप्रतिनिधींची सुद्धा यावेळी अग्निपरीक्षा होत आहे.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा
पालकमंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शितल यांनी पतीची धावपळ आणि सामान्य मानसाप्रती जिव्हाळा पाहून स्वतः ही शिलाई मशीनवर 'मास्क' तयार करत आहेत. मागील 10 दिवसांपासून त्या नित्यक्रमाने दररोज 100पेक्षा अधिक मास्क तयार करण्याचे काम करत आहेत. तसेच हे मास्क मतदारसंघात वितरित करण्याचे काम करत आहेत. याशिवाय राठोड यांनी आपल्या घरीच कार्यालयातून जिल्हा आणी मतदारसंघाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि मदतीसाठी स्वतंत्र 12 लोकांची टीम तयार केली आहे. ही सर्व मंडळी आणि पालकमंत्री राठोड जनतेच्या सतत संपर्कात आहेत. राठोड यांची मोठी मुलगी दिव्या राठोड ही देखील परराज्यातील अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईनवर दिवसभर अडचणी समजून घेत आहे.