महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ना वाद्यांचा गजर, ना गुलालाची उधळण; साध्या पद्धतीने जगदंबेचे आगमन - Durga Utsav Yavatmal News

संपूर्ण जिल्ह्यात अनेक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांकडून देवीची स्थापना करता येते. जिल्ह्यात गतवर्षी पाच हजारांवर मंडळांनी देवीची स्थापना केली होती. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक उत्सव साजरा करणारी मंडळे अर्ध्या संख्येवर आली आहेत. यावर्षी 2 हजार 656 मंडळांनी दुर्गा देवीची तर, 347 मंडळांनी शारदा देवीची स्थापना केली आहे.

साध्या पद्धतीने जगदंबेचे आगमन
साध्या पद्धतीने जगदंबेचे आगमन

By

Published : Oct 17, 2020, 6:21 PM IST

यवतमाळ - कोरोनाचे संकट पाहता यावर्षी अनेक दुर्गा उत्सव मंडळांनी घट स्थापनेचा निर्णय घेतला. यात जी मंडळे देवीच्या मूर्ती स्थापन करीत आहेत, तेही अत्यंत साध्या पद्धतीने उत्सवाची सुरुवात करत आहेत. ना वाद्यांचा गजर, ना गुलालाची उधळण अशा साध्या पद्धतीने जगदंबेचे आगमन होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे उत्साहावर विरजण जरी पडले असले तरी, विधीवत पूजा करून देवीची स्थापना करण्यात येत आहे.

साध्या पद्धतीने जगदंबेचे आगमन
ना वाद्यांचा गजर, ना गुलालाची उधळण; साध्या पद्धतीने जगदंबेचे आगमन

हेही वाचा -केळापूर येथील जगदंबा माता मंदिर यात्रा महोत्सव रद्द; भाविकांच्या आराधनेत पडणार यावर्षी खंड

संपूर्ण जिल्ह्यात अनेक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांकडून देवीची स्थापना करता येते. जिल्ह्यात गतवर्षी पाच हजारांवर मंडळांनी देवीची स्थापना केली होती. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक उत्सव साजरा करणारी मंडळे अर्ध्या संख्येवर आली आहेत. यावर्षी 2 हजार 656 मंडळांनी दुर्गा देवीची तर, 347 मंडळांनी शारदा देवीची स्थापना केली आहे.

ग्रामीण भागात दुर्गा उत्सव मंडळांना पोलीस विभागाकडून परवानगी नाकारण्यात आल्याने स्थापना अर्ध्यावर आली आहेत. यवतमाळ शहरात दरवर्षी भव्यदिव्य देखावे या नवरात्री उत्सवात पहावयास मिळतात. जिल्ह्यातील तसेच, परजिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने हे देखावे पाहण्यासाठी पाहण्यासाठी हजेरी लावतात. मात्र, यावर्षी कुठल्याच मंडळाने मोठे देखावे न करता अत्यंत साध्या पद्धतीने देवीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज सकाळपासूनच अनेक मंडळे आणि भाविकांनी ट्रॉली, टेम्पो, ट्रक, ऑटोरिक्षा यातून देवीची मूर्ती आणून विधीवत पूजा करून स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. मंडळाकडून सामाजिक अंतर तसेच शासनाचे सर्व नियम पाळून पुढील नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा -दुर्गा मातेच्या साज खरेदीसाठी भाविकांची बाजारात गर्दी; साध्या पद्धतीने होणार घटस्थापना

ABOUT THE AUTHOR

...view details