महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"ठेकेदार बोले तैसी नगरपालिका चाले" यवतमाळ नगरपालिकेतील कारभारावर काँग्रेसची टिका - यवतमाळ नगरपरिषदेत अनागोंदी

यवतमाळ नगरपरिषदेत भाजपची सत्ता असून पालिकेत सर्व अनागोंदी आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते चंदू चौधरी यांनी केला आहे. नगरपालिकेच्या एकाधिकारशाही विरोधात सर्व विरोधी पक्षांना सोबत घेवून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यवतमाळ नगरपालिकेतील कारभारावर काँग्रेसची टिका

By

Published : Aug 18, 2019, 2:13 PM IST

यवतमाळ -नगरपालिकेत भाजपची एकाधिकारशाही असून, ठेकेदारांच्या इशाऱ्यावर कारभार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते चंदू चौधरी यांनी केला आहे. पालिकेच्या या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक एकवटले असून, नगरपालिकेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.

"ठेकेदार बोले तैसी नगरपालिका चाले" यवतमाळ नगरपालिकेतील कारभारावर काँग्रेसची टिका

भाजपच्या मर्जीतील ठेकेदारांची पालिकेत एकाधिकारशाही - काँग्रेस

पालिकेचा कारभार ठेकेदारांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. ठेकेदार बोले तैसे नगरपालिका चाले असा सर्वत्र कारभार यवतमाळ नगरपालिकेत सुरू आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

मागील तीन वर्षांत पालिकेचा कारभार कोलमडला आहे - चंदू चौधरी

पालकमंत्री, प्रशासनाचे शहराकडे दुर्लक्ष होत आहे. पालिकेत केवळ मर्जितल्या ठेकेदारांची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप काँग्रेससहीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी केला आहे. शहरातील समस्या सुटताना दिसत नसल्याने आता नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी करीत आहोत. मात्र काहीच उपयोग होत नाही. वास्तविक या सर्व प्रकाराला पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप चंदु चौधरी यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details