महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीचे अनैतिक संबंध, नातेवाईकाच्या मदतीने पतीचा खून - यवतमाळमधील मोवाड्यात पतीचा खून

पती झोपल्यानंतर पाळतीवर असणाऱ्या आपल्या साथीदाराच्या सहाय्याने पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. खून केल्यानंतर तीने चोरीचा बनाव केला, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच गून्हा कबूल केला.

पत्नीने केला पतीचा खून

By

Published : Aug 10, 2019, 8:08 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मोवाडा गावात एका ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली. सुभाष किसन राठोड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीच्या पत्नीनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने नवऱ्याला मारल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध, नात्यातील साथीदाराच्या मदतीनेच केला पतीचा खून

घाटंजी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मोवाडा (मोठा) येथे सुभाष किसन राठोड याची झोपेत असतानाच डोक्यावर घाव घालून खून केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती त्याची पत्नी आदिना हिने पहाटे शेजारच्या लोकांना दिली. या नंतर स्थानिक पोलिसपाटील यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तेव्हा घरातील कपाटातील कपडे व सामान अस्ताव्यस्त पडले होते. तसेच मृताची पत्नी आदिना हिने गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले व घरात चोरी सुध्दा झाली, असा बेबनाव केला. पोलिसांनी सुभाषच्या मृतदेहाची उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यानंतर पुढील चौकशीकरता पत्नी आदिना हिला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. तेव्हा पोलिसांना तिच्या हुलकावणी देण्याऱ्या उत्तरांवरून तिच्यावरचा संशय बळावला. पोलिसांनी तिचा एका नातेवाईक अंकुश याला मोबाईलच्या लोकेशन्स वरून ताब्यात घेतले. त्या नातेवाईकाला ताब्यात घेतल्यानंतर मात्र पत्नी आदिना हिने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधातून आपण अंकुशच्या मदतीने पती सुभाष राठोड याचा खून केल्याचा गून्हा कबुल केला.

सायंकाळी कुटुंबातील सदस्य दोन मुली, एक मुलगा आणि सुभाष जेवण करून खाटेवर झोपी गेले होते. तेव्हा रात्री पत्नी आदिना हि लघुशंकेच्या निमित्ताने दार उघडून घराबाहेर आली. तेव्हा पाळतीवर असणाऱ्या अंकुश याला माहिती दिली. यानंतर झोपेतच सुभाषच्या डोक्यावर घाव घालून खून केला, अशी कबुली दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details