यवतमाळ - विधान परिषद निवडणूक काही दिवसांवर आल्याने प्रचाराच्या तोफा कडाडत आहेत. राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात आल्याने यंदा महाविकास आघाडी, भाजप आणि अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
यवतमाळ विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीने कसली कंबर, आण्णाराव पाटील प्रचारासाठी दाखल - yavatmal legislative council election
विधानपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा कडाडत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अॅड.आण्णाराव पाटील यांनी कमान सांभाळली आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीने अपक्ष उमेदवार संजय देरकर हे स्थानिक असल्याने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी अॅड.अण्णाराव पाटील यांना मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी पाठवले आहे. महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी तर भाजपकडून सुमित बाजोरिया निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सेनेचे बाळासाहेब मुनगिनवार यांचे बंड थंड करण्यात पक्षातील नेत्यांना यश आल्याने देरकर यांचे पारडे जड झाले आहे. यातच त्यांना दीपक निलावार, शंकर बडे या उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच स्थानिक उमेदवारांना मतदारांच्या प्रश्नांची जाण असल्याने मतदार योग्य निर्णय घेतील, असे पाटील मत पाटील यांनी मांडले आहे.