यवतमाळ - खापरी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर यवतमाळ एलसीबी (स्थानिका गुन्हे पथक) पथकाने धाड टाकून १४ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एलसीबी पथकाने 51 हजार 330 रूपयाची रोख, 6 दुचाकी आणि 12 मोबाईल असा एकूण 3 लाख 21 हजार 430 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन साबापूरेसह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार, घाटंजी तालुक्यातील खापरी येथील सचिन साबापुरे याच्या घराच्या वरच्या माळ्यावर मोठ्या प्रमाणात जुगार भरत होता. याबाबतची गोपनीय यवतमाळ एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यावरून यवतमाळ एलसीबी पथकाने घाटंजीतील खापरी गाठून राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकली. यावेळी 14 जुगारी जुगार खेळताना एलसीबी पथकाला आढळून आले.