यवतमाळात शुक्रवारपासून ‘लॉकडाऊन’? पालकमंत्री राठोडांनी घेतला कोरोनाचा आढावा - यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊन कधी
यवतमाळ, पुसद, दिग्रस दारव्हा, पांढरकवडा तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी करावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा गांभिर्याने शोध घेण्याचे आदेश पालकमंत्री राठोड यांनी दिले.
यवतमाळ- जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे. नागरिकांकडून कोव्हिड संदर्भातील सुचनांचे काटेकोरपणे पालन करायला हवे आणि चाचण्यांसाठी समोर आयला हवे. अन्यथा प्रशासनाला ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय पर्याय नाही. तसेच येत्या दोन-तीन दिवसात या परिस्थितीवर गांभिर्याने लक्ष ठेवले जाईल. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात 26 फेब्रुवारीपासून किमान 10 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.