महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Farmer Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेची लागड; शेतकऱ्याचे वर्षाला सरासरी 10 लाखांचे उत्पन्न - पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेची लागड

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्या ( Farmers suicides in Yavatmal ) करण्याचे सत्र काही थांबत नाही. त्यासाठी पारंपरिक शेती हेहील एक कारण असल्याचे बोलले जाते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. या समस्येवर करत दिलीप वानखेडे फळबागेतून दहा ते बारा लाखांचे वार्षिक उत्पन्न ( Dilip Wankhede Income by cultivation ) घेत आहेत.

यवतमाळ शेतकरी उत्पन्न
यवतमाळ शेतकरी उत्पन्न

By

Published : Dec 10, 2021, 3:29 PM IST

Updated : Dec 10, 2021, 3:42 PM IST

यवतमाळ - शेतकरी आत्महत्यांसाठी यवतमाळ ( Yavatmal District of Farmers suicide ) जिल्हा ओळखला जातो. अशा परिस्थिती आर्णी तालुक्यातील तेंडोळी येथील शेतकऱ्याने कपाशी, सोयाबीन आणि तूर या पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेची नवीन वाट ( Yavatmal farmer started fruit crops cultivation ) निवडली. त्यातून त्यांच्या घरात आर्थिक समृद्धी आली. दिलीप वानखेडे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र काही थांबत नाही. त्यासाठी पारंपरिक शेती हेही एक कारण असल्याचे बोलले जाते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. या समस्येवर करत दिलीप वानखेडे फळबागेतून दहा ते बारा लाखांचे वार्षिक उत्पन्न ( Dilip Wankhede Income by cultivation ) घेत आहेत.

आर्थिक तोट्यातून समृद्धीकडे

हेही वाचा-सात दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अन्यथा केंद्राकडे तक्रार- कृषीमंत्र्यांचा विमा कंपन्यांना इशारा

पारंपरिक शेतीमुळे सुरुवातीला आर्थिक तोटा

दिलीप वानखेडे हे आपल्याकडे असलेल्या अठरा एकर शेतीमध्ये दरवर्षी कपाशी, सोयाबीन, तूर हे पारंपरिक पीक घेत होते. मात्र, यात उत्पन्न कमी आणि तोटाच येत होता. लागवड खर्चही उतपन्नातून मिळत नव्हता. त्यामुळे शेतात विहीर असल्याने ते तीन वर्षांपूर्वी फळबागेकडे वळलो पाहिजे, असे त्यांना वाटले. यातूनच त्यांनी चार एकर वर सिताफळ, लिंबू पाच एकरावर, पेरू आणि अंजीर या फळांची पाच एकरावर ( fruit crops cultivation in Yavatmal ) लागवड केली.

हेही वाचा-ST Workers Strike : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर; छोटे व्यापारी- शेतकरी संकटात!

सेंद्रिय पद्धतीने संपूर्ण फळबागेत उत्पन्न-
दिलीप वानखेडे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये लिंबू, पेरू, सीताफळ आणि अंजीर यांची लागवड केली. पावसाळ्यात सीताफळ खराब होऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येक फळाला प्लास्टिकची बॅग लावली. कुठल्याच फळ व पिकाला ते रासायनिक खते व रासायनिक फवारणी करीत नाही. केवळ शेणखत, जीवामृत व सेंद्रीय खत, असल्यामुळे फळांची वाढ चांगली होते. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न हाती येत आहे. सीताफळाचे अर्धा किलोपासून एक किलो पर्यंतचे वजन आहे. तर पेरू 500 ग्रॅमपर्यंत वजनाचे आहे. लिंबूचे वजनही 200 ते 300 ग्रॅम इतके आहे. लिंबाला नागपूरला चांगली मागणी आहे. तर इतर फळांना नागपूर, अमरावती, आणि यवतमाळ या शहरात चांगली मागणी असल्याने विक्री करण्यात येते.

हेही वाचा-Nana Patole on Farmers agitation : मोदी सरकारचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने जुमला ठरू नयेत - नाना पटोले

कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी हा अडचणीतच सापडल्याचे अनेकदा पहायला मिळाले. बाजारपेठेतील दर, उत्पादनातील फेरबदल आणि बाजारपेठेतील मागणी पाहून अनेक शेतकरी फळबागेकडे वळत आहेत.

Last Updated : Dec 10, 2021, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details