यवतमाळ - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा वेग मंदावला आहे. तर, निगेटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी, मागील 24 तासांत चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि 102 नव्या पॉझेटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात 102 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू - यवतमाळ जिल्हा
यवतमाळ जिल्ह्यात मागील 24 तासांत 102 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, चार जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 9 हजार 338 वर पोहोचली आहे.
मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 62 व 60 वर्षीय पुरुष आणि 69 वर्षीय महिला तसेच दारव्हा तालुक्यातील 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासांत एकूण 1 हजार 184 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 102 जण पॉझेटिव्ह तर, 1 हजार 82 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 473 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 9 हजार 338 झाली आहे. तर आज (शुक्रवार) 54 जणांना सुट्टी मिळाल्याने आतापर्यंत 8 हजार 399 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाआहे. जिल्ह्यात आतापर्यंत 297 मृत्यूची नोंद आहे.