यवतमाळ -गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 355 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 463 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील चार मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर दोन मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहे.
जिल्ह्यात 3539 कोरोनाचे सक्रिय रुग्ण
शुक्रवारी एकूण 7231 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 355 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 70099 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 463 जणांनी कोरोनावर मत केल्याने, कोरोनामुक्तांचा एकूण आकडा हा 64874 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1687 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या 3539 सक्रिय रुग्ण असून, यातील 1742 रुग्णांवर विविध रुग्णालयात तर 1797 रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, जिल्ह्यात एकूण 1361 बेड उपलब्ध आहेत.
होही वाचा -'विरोधी पक्षाचे संकटाच्या काळातही राजकारण'