यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विलगीकरण कक्ष, विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 52 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात मागील 24 तासात 47 जण नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यवतमाळ कोरोना अपडेट : 52 जण कोरोनामुक्त; 47 नवे रुग्ण आढळले - कोरोना यवतमाळ बातमी
जिल्ह्यात सद्यस्थितीत 358 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यात होम आयसोलेशनमधील 98 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 135 झाली आहे.
जिल्ह्यात 358 ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 399 व्यक्तींचे अहवाल मिळाले आहेत. यापैकी 47 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह तर 352 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 358 ॲक्टिव्ह रुग्ण असून यात गृह विलगीकरणातील 98 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 135 झाली आहे. आज 52 जणांना सुट्टी मिळाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 9 हजार 45 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्यूंची नोंद झाली आहे.