यवतमाळ- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बुधवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या मागील १० वर्षांतील नोंदी असलेल्या जुन्या कागदपत्रांसह संगणक, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळेच ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेला भीषण आग, १० वर्षांतील रेकॉर्ड जळाले - fire
यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली असून यामध्ये अकाउंट विभागाचा अर्धा भाग तर शेती विभागाचा पूर्ण भाग जळून खाक झाला आहे.
![यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेला भीषण आग, १० वर्षांतील रेकॉर्ड जळाले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3229498-thumbnail-3x2-ytl.jpg)
यवतमाळ शहर पोलीस ठाण्याला लागून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. रात्री आग लागताच बँकेच्या चौकीदारांनी प्रशासकीय अधिकारी आणि बँकेचे मुख्य अधिकारी दीपक देशपांडे यांना तत्काळ घटनेची माहिती दिली. इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली असून यामध्ये अकाउंट विभागाचा अर्धा भाग तर शेती विभागाचा पूर्ण भाग जळून खाक झाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांतील बँकेत सीबीएस प्रणाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात कुठलाच डाटा नाही. तसेच बँकेची पदभरती ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे आगीचा कुठलाही परिणाम त्यावर झाला नसल्याचे मुख्याधिकारी देशपांडे यांनी सांगितले.
या आगीच्या घटनेत २५-३० संगणक, कपाटे, फर्निचर यांचे नुकसान झाले आहे. मात्र, नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे सध्यातरी सांगता येणार नसल्याचे देशपांडे म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुनी आहे. त्यामुळे या बँकेत शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता असल्याचेही संभावना मुख्याधिकारी देशपांडे यांनी वर्तवली आहे. त्याचप्रमाणे १० वर्षांतील रेकॉर्ड जळून खाक झाले असले तरी बँकेत सीबीएस प्रणाली असल्यामुळे हा डेटा रिकव्हर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.