महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2020, 9:36 AM IST

ETV Bharat / state

विधानपरिषद पोट निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासन सज्ज

यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे सुमित बाजोरिया लढत आहेत.

यवतमाळ पोटनिवडणूक
यवतमाळ पोटनिवडणूक

यवतमाळ - विधानपरिषद पोट निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील वणी, केळापूर, राळेगाव, यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड या सात ठिकाणी मतदान घेतले जाणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरिया रिंगणात आहेत.

विधानपरिषद पोट निवडणूकीसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासन सज्ज


यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे सुमित बाजोरिया लढत आहेत.

हेही वाचा - पंतप्रधान मोदी आता हल्लेखोराला कपड्यांवरून ओळखा'
निवडणूक कर्मचाऱ्यांना 23 आणि 25 जानेवारीला मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून तोपर्यंत मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात ठेवल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवनात मतमोजणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details