महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ: विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन - कॉंग्रेसचा भारत बंदला पाठिंबा यवतमाळ

गेल्या 4 महिन्यांपासून केंद्राने तयार केलेल्या नव्या कृषी कयद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला काँग्रेसने पाठिंबा देत, जिल्हाभरात आंदोलन केले. यावेळी कृषी कयदे रद्द करण्याची मागणी करत, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Mar 27, 2021, 4:28 PM IST

यवतमाळ -गेल्या 4 महिन्यांपासून केंद्राने तयार केलेल्या नव्या कृषी कयद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला काँग्रेसने पाठिंबा देत, जिल्हाभरात आंदोलन केले. यावेळी कृषी कयदे रद्द करण्याची मागणी करत, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी

केंद्र सरकारने तयार केलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहेत. याविरोधात शेतकरी गेल्या 4 महिन्यांपासून दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असून, जोपर्यंत कायदे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत काँग्रेस स्वस्त बसणार नाही, असा इशारा यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. हे आंदोलन जिल्ह्यातील नेर, दारवा, महागाव, कळम, उमरखेडसह इतर तालुक्यात देखील करण्यात आले.

हेही वाचा -गुलाबशेती वाचवण्यासाठी तयार केले सहा कोटी लीटर क्षमतेचे शेततळे!

ABOUT THE AUTHOR

...view details