यवतमाळ- जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी होत असताना शेतकऱ्यांना रांगेत वाट पाहावी लागत आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोदामांची साठवण क्षमता कमी असल्याने जिल्हा प्रशासन थेट गोदामे भाड्याने घेणार आहे.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी बाजार समित्यांचे व खाजगी गोदाम तूर व कापूस खरेदीकरीता भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने कापूस आणि तुरीचे उत्पादनही चांगले झाले आहे. मात्र, शेतकऱयांचा माल साठविण्यासाठी गोदामांची कमतरता जाणवत आहे. राज्य वखार महामंडळांचे गोदाम अपुरे पडत आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तसेच खाजगी गोदाम भाड्याने करण्यात येणार आहे. मंगळवारपासून या गोदांमाचा वापरही सुरू होणार आहे.
हेही वाचा-चिंताजनक! केंद्र सरकारने मिळविलेल्या महसुलापैकी ८४.१ टक्के जानेवारीपर्यंत खर्च