महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक: शासकीय सुट्टीतही जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू - यवतमाळ ग्रामपंचायत न्यूज

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ येथील कार्यालयात निवडणुकीत उभे राहू इच्छिणा-या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहे. अशातच सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून २५ ते २७ डिसेंबपर्यंत असणाऱ्या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही समिती कार्यालय सुरू राहणार आहे.

यवतमाळ जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय
यवतमाळ जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय

By

Published : Dec 25, 2020, 1:16 PM IST

यवतमाळ: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती जोडणे बंधनकारक केले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ येथील कार्यालयात निवडणुकीत उभे राहू इच्छिणा-या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहे. अशातच सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून २५ ते २७ डिसेंबपर्यंत असणाऱ्या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही समिती कार्यालय सुरू राहणार आहे.

शासकीय सुट्टीतही जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू

९८० ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक

राज्य निवडणूक आयोगाद्वारे जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे 1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करून ऑनलाईन सबमिट करावे लागणार आहे. याची प्रिंट नामनिर्देशन पत्रासोबत जोडावी लागणार आहे. 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख असून 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे.

हेही वाचा-LIVE : 'शेतकरी संवाद अभियान' : प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स....

हेही वाचा-फक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर होत नाही; मंत्री यशोमती ठाकुरांची पंतप्रधानांवर बोचरी टीका

ABOUT THE AUTHOR

...view details