महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Rathod : संजय राठोड कोण आहेत? ते सध्या चर्चेत का आहेत? - संत गाडगे बाबा विमानतळ

Sanjay Rathod : यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान संजय राठोड यांनी दिले होते.

Sanjay Rathod
Sanjay Rathod

By

Published : Aug 10, 2022, 7:44 AM IST

Updated : Aug 10, 2022, 7:51 AM IST

यवतमाळ - संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. वयाच्या 27 व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली. त्यानंतर आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आणि दिग्रस विधानसभा संघातून निवडून येत आमदार झाले. मात्र, पुण्यातील एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांना आपल्याकडे असलेल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काही दिवस शांत होते. पुन्हा बंड केलेल्या आमदारांमध्ये विशेष म्हणजे एकनाथ शिंदेच्या प्रमुख नेत्यांमध्ये ते चर्चेसाठी उपस्थित होते. सोबतच त्यांची ही धडपड पुन्हा मंत्री मिळवण्यात सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तत्कालीन वन मंत्री संजय राठोडांना टिकटॉक स्टार पुण्यातील एका मुलीच्या आत्महत्येमुळे राजीनामा द्यावा लागला. पुण्यातील एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर माध्यमांत फोन वरील संभाषणाच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यातील आवाज हा टिकटॉक स्टार मुलगी आणि संजय राठोड यांचा असल्याचे बोलले गेले. यातील एका ऑडिओ क्लिपमुळे 'गबरुशेठ' हे नाव चर्चेत आले. टिकटॉक स्टार मुलगी हिची आत्महत्या नसून संजय राठोड यांनीच हत्या घडवली, असल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून करण्यात आला होता. सरकारवर याबाबतीत वाढत्या दबावामुळे शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोडांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला होता.

आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधले - शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिले होते.

माणिकराव ठाकरेंचा पराभव -अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला होता. 2004 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले होते. 2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव करण्यात आला आहे.

राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी -राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली होती. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव करण्यात आला होता. 2019 मध्ये संजय देशमुख यांचे तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असे असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. यापूर्वी भाजप- शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होते.

'ग्रामीण भागातील शिवसेनेचं नेतृत्व' -संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार होते. "संजय राठोड ज्या मतदार संघातून येतात तो मतदार संघ कायम बंजारा, कुणबी बहुल राहिलाय. बंजारा मतं ही त्यांच्या विजयासाठी नेहमी निर्णायक राहिली आहे. या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड हे जरी पुढे आले असतील, तरी त्यांनी समाज उपयोगी कामं किती केले, यावर वादविवाद होतील. ग्रामीण भागातील शिवसेनेनं उभं केलेलं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहता येईल."

"गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जर शिवसेनेचा कार्यकाळ बघितला खासकरून युती सरकारच्या काळातला कार्यकाळ बघितला, तर विदर्भामध्ये यवतमाळमधील दारव्हा दिग्रस या भागात शिवसेना वाढली ती संजय राठोड आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिक दादा गवळी यांच्यामुळे शिवसेना वाढली होती.

मतदार संघ- दारव्हा-दिग्रस-नेर

जन्म- 30 जून 1971

जन्म गाव- पहूर, ता. कळंब- जि. यवतमाळ

शिक्षण- बी कॉम बीपीएड

वडिलांचे नाव- दुलीचंद राठोड

आईचे नाव - प्रेपिला दुलीचंद राठोड

पत्नीचे नाव- शीतल संजय राठोड

मुले- दामिनी ( मुलगी ) आणि सोहम ( मुलगा)

-1995-96 पासून शिवसेनेत शिवसैनिक म्हणून सक्रिय जिल्ह्यात सेनेची घट्ट बांधणी केली त्याचे फळ म्हणून

- 1998-1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदी निवड केली.

- 2002-2003 पासून तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या दारव्हा- नेर मतदार संघात सक्रिय

- 2004 मध्ये दारव्हा- नेर मतदार संघात माणिकराव ठाकरे यांचा 22 हजार मतांनी पराभव करून पहिल्यांदा आमदार झाले.

- 2009 माजी मंत्री संजय देशमुख यांना पराभूत करून दुसऱ्यांदा पुर्नरचनेत दारव्हा- दिग्रस- नेर मतदार सांगातून आमदार पदी 50 हजार विजयी मते घेतलेली

- 2014 मध्ये भाजपचे उमेदवार संजय देशमुख यांचा पुन्हा पराभव केला.

- 2014 मध्ये महसूल राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश, दरम्यान यवतमाळ जिल्ह्याचे एक वर्ष पालकमंत्री पद ही सांभाळले उर्वरित काळात वाशिम जिल्ह्याची पालकमंत्री पद सांभाळले.

- 2019 मध्ये अपक्ष उमेदवार माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पुन्हा पराभव, वनमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश

- दरम्यानच्या काळात वैयक्तिक आरोपामुळे मंत्रिपद गमवावे लागले

- जून 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील

- 9 ऑगस्टला पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथविधी

- दर सोमवारी यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात

- मंगळवार ते गुरुवार मुंबई मंत्रालयातील कामे

- शुक्रवार ते रविवार हे आपल्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा नागरिकांच्या समस्या जाणून घेतात

- मतदारसंघातील आणि यवतमाळ जनसंपर्क कार्यालयाचे दिवस हे ' संजुभाऊंची 'ओपीडी' म्हणून परिचित

हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : 18 आमदारांचा शपथविधी, आरोप-प्रत्यारोप...; 'असा' राहिला मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस

हेही वाचा -Bihar Political Crisis : भाजपचा 'पत्ता कट..' बिहारमध्ये 'महागठबंधन'चा प्रयोग.. नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ.. तेजस्वी होणार उपमुख्यमंत्री

Last Updated : Aug 10, 2022, 7:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details